

पोंभूर्णा तालुक्यात सर्वत्र तेंदुसंकलणाचे काम सुरु असुन ग्रामीण भागातील नागरीकांना रोजगार मिळाला आहे यामुळे आर्थीक अडचण कुठेतरी कमी होत आहे मात्र जीवाची पर्वा न करता नागरीक महिला मोठ्या संख्येंनी तेंदुपत्ता संकलणासाठी जंगलात जातात मात्र जंगलात प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने कधी काय होणार सांगता येत नाहि अशीच एक घटणा आज सकाळी पोंभूर्णा तालुक्यातील कसरगठ्ठा बीटात घडली मौजा बोर्डा बोरकर येथील ऋषीजी देवगडे वय ५५ वर्ष हे तेंदुपत्ता संकलणासाठी सकाळी जंगलात गेले असता अचानक रानगव्याने त्यांचेवर हल्ला चढवीत त्यांना जखमी केले शेजारीच असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे धाव घेतल्यानी रानगवा तिथुन निघून गेला आणि सुदैवानी जीवीत हानी टळली मात्र घरातील कर्ता पुरुषच जखमी झाल्याने कुंटुबाबर आर्थीक संकट कोसळले आहे शासनानी या कुटुंबीयांना आर्थीक साहाय्य करावे अशी मागणी परीसरातील नागरींकाकडून होत आहे घटणास्थळी वणपरीक्षेत्राचे अधिकारी दाखल झाले घटणेचा पंचनामा करून जखमी इसमाला औषधो उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्नालय चंद्रपुर येथे पाठविन्यात आले
