उमरी पोतदार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. आज बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा तुम्हा सर्वांना चांगलीच माहिती असेल. अठराव्या शतकाबद्दल बोलायचे झाले तर इथल्या मुलींना लिहिण्या-वाचण्याचे स्वातंत्र्य नव्हते. महिलांना बुरख्यात ठेवण्यात आले होते. अशा वेळी या सर्व दुष्कृत्यांना मागे टाकून सावित्रीबाई फुले यांनी असे काही केले की आजही लोकांच्या स्मरणात आहे. याच कर्तुत्वाची जाणीव जागृती व्हावी म्हणून आज पाहणारे डोळे आणि मदतीचे हात बहुद्देशीय सामाजिक संस्था, उमरी पोतदार यांच्या वतीने गावामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
सोबतच संस्थेच्या वतीने जि. प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व बालिका दिनाचा औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कला,गुणांना वाव मिळावा म्हणून निबंध, वक्तृत्व , रांगोळी, प्रश्नमंजुषा स्पर्धा अश्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक कदम सर, गव्हारे सर, कोवे सर व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच बंडू लेनगुरे , कपिल ठाकरे, विनोद लेनगुरे, महेश लेनगुरे, सुनीता शेंडे, संस्थेतील अंकुश उराडे, संदिप यम्पलवार,निखिल झबाडे, निखिल झुरमुरे,भिमराव मेश्राम, तेजराज सिडाम, चंद्रकांत सिडाम,नदिम कुमरे,मनिष ठाकरे, चेतन कावळे, अंकुश लेनगुरे, अनंत शेंडे, रोहित वरगंटीवार उपस्थित होते.