विजेच्या झटक्याने कामगार गंभीर, वरोरा रेल्वे स्टेशन येथील घटना

वरोरा रेल्वे स्टेशन येथील विद्युत कामाचा कंत्राट एका खासगी कंपनीला दिला असल्याने त्या कंत्राटदाराचा मजूरआज सकाळी 9 चया दरम्यान प्लॅटफॉर्म नंबर 4 वर नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेला असता अचानक विजेच्या झटक्याने तो क्षत्रिग्रस्त झाला .या मजुरांचे नाव संजय कुमार असून त्याचे वय 24 इतके आहे.विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याने हा तरुण गंभीर असून त्याला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले होते.प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .हा तरुण 60 ते 70 % भाजला आहे.