इन्नरव्हील मुळे नांदेडमध्ये महिलांची संघटन मजबूत: वर्षा ठाकूर

हिमायतनगर प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी


जिल्ह्यातील सर्व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लबच्या पद ग्रहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर सह इतवारा पोलीस स्टेशनच्या दिनकर मॅडम यांच्या उपस्थितीत इनरव्हील क्लब नांदेडच्या जिल्हा अध्यक्षपदी कीर्ती सुस्तरवार तर सचिव पदी विद्या पाटील व आय.एस. ओ. मीनाक्षी पाटील यांची निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला
यावेळी बोलताना नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी महिला एकीकरणाचे महत्त्व सांगत महिलांच्या संघटन वाढीसाठी आपण काय काय काम केले पाहिजे ह्या संदर्भात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व त्यानंतर नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की महिलांच्या संघटन कौशल्यामुळे आज आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतो त्यामुळे ह्या समाजात वावरत असताना आपण आपल्या कुटुंबाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे कुटुंबाला वेळ देऊन आपण सामाजिक कार्यात सुधा अग्रेसर राहून काम केल्याने आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळात अगणित यश प्राप्त होईल त्यामुळे माझ्याकडून तुमच्या ह्या इन्नरव्हील क्लबला खूप खूप शुभेच्छा व नवनिर्वाचित सर्व महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यानंतर इनरव्हील क्लबच्या नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष कीर्ती सुस्तरवार यांनी त्यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली त्यात वटपौर्णिमेच्या दिवशी वृक्षारोपण करून एक सामाजिक संदेश देत ठीक ठिकाणी वृक्षारोपण केले, व दोन दिवसापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जवळपास साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले , देशातील ही सर्वात मोठी महिलांची संघटना आहे त्यात 104 राज्यात ,3979 क्लब मार्फत 108614 महिला सामाजिक कार्य करतात त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमात नांदेड इनरव्हील क्लबच्या सर्व महिला नेहमी अग्रेसर असतात येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही अजून हिरहिरीने समाज कार्यात सहभाग घेऊन आमचे कार्य आम्ही पार पाडू असे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी या इनरव्हील क्लब नांदेडच्या जिल्हा अध्यक्षपदी कीर्ती सुस्तरवार तर सचिव पदी विद्या पाटील व आय.एस. ओ. मीनाक्षी पाटील, यांची निवड करण्यात आली यावेळी विमल येन्नावार, उमा श्रीनिवासन, सोनाली देशमुख, रत्ना जाजू, अरुणा देशमुख, करिश्मा मगनाळे,रुची शुक्ला,सह कल्याणी हुरणे ह्यांचे ह्या कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे