हदगाव-ही.नगर मतदार संघात शिवसंपर्क अभियानास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव

पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण महाराष्ट्र भर शिवसंपर्क अभियान मोठ्या जोमात सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून हदगाव – हि. नगर मतदार संघामध्ये शुक्रवार दि. 16 जुलै पासून या अभियानास सुरुवात झाली काल ही. नगर तालुक्यातील ही. नगर, कामारी, सिरंजनी, वाळकेवाडी इत्यादी सह अनेक गावात हे अभियान पार पडले. यावेळी असंख्य नागरिकांनी माजी आमदार नागेश पाटील व जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आज शनिवार दुसर्‍या दिवशी तालुक्यातील लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,वीर भगवान बिरसा मुंडा,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिवसंपर्क अभियानस सुरुवात झाली. यावेळी शिवसेना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे साहेब, माजी जि. प.उपाध्यक्ष शिवसेना नेते गंगाधर पाटील चाभरेकर साहेब,जेष्ठ नेते भगवान दादा पाथरडकर,उपजिल्हाप्रमुख रमेश घंटलवार, विधानसभा संघटक अवधुत देवसरकर, दिलीप बास्टेवाड,बोईनवाड साहेब, कलाने सर,पंचयातसमिती सभापती तम्मलवाड ताई ,अमोल पाटील रुईकर,संदेश पाटील हडसनिकर,गोविद कौशल्य,व इतर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.