माता अन्नपूर्णा जनकल्याण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ऑक्सिजन मशीन माजरीवासीयांच्या सेवेत

प्रतिनिधी- चैतन्य कोहळे, भद्रावती


कोविड-19 असा भीषण संसर्गजन्य रोग असताना ऑक्सिजन ही काळाची गरज झालेली आहे. आणि लॉक डाऊन च्या काळात कृत्रिम ऑक्सिजन असेल तरच आपण पेशंटचा जीव वाचू शकतो. त्यामध्ये डॉक्टर हेडगेवार सेवा समिती व तसेच माता अन्नपूर्णा जनकल्याण बहुउद्देशीय संस्था माजरी चे संस्थापक चैतन्य कोहळे यांच्या प्रयत्नातून माजरी वासियांना आज ऑक्सीजन मशीन चे लोकार्पण करण्यात आले ज्या कोणाला ऑक्सिजनची गरज भासल्यास निशुल्क मशीन सेवेसाठी उपलब्ध करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. लोकार्पण सोहळ्यात भारतीय जनता महिला आघाडीच्या सौ संध्याताई सिडाम व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी विस्मय बहादे, चैतन्य कोहळे, गणेश खरवार, राकेश येमलावार, शिवशंकर मडावी, जसवंत सिंह, रंजीत सेवडीया, राजू वर्मा अनेक कार्यकर्ते उपलब्ध होते.