
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
करंजी ( सो ) या गावात येणारा मुख्य रस्ता म्हणजे वाढोना – करंजी या रस्त्या वर गावा लगत नाला असून या नाल्या वरील पूल कित्तेक वर्ष जुना असून या पुलाची उंची फक्त 3 – 4 फूट आहे.
पाऊस काळा मध्ये नाल्याला पाणी येताच या पूल वरून पाणी वाहू लागते व ग्रामवासीयांची ये – जा बंद होते .हा गावातील मुख्य रास्ता असल्या मुळे गावकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा कित्येक वेळा पूला वरून पाणी असल्याने अडकून राहाव लागते .
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत वाढोना ते करंजी हा 3 की.मी रस्त्याचे पक्के बांधकाम झालेले आहे परंतू या नादुरुस्त पूला मुळे गावकऱ्यांच्या जीवाला नेहमीच धोका असतो. मजुरदार ,विद्यार्थी,गावकरी कित्येकदा पूला वरून पाणी असल्याने अडकून पाणी कमी होण्याची वाट बघत बसतात.
तरी सध्या स्थितीत असलेला नादुरुस्त पूल पाडून त्वरित नवीन पुलाचे बांधकाम मंजूर करून देण्यात यावे आशा प्रकारचे निवेदन व ग्रा.पं.ठराव जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.बाळासाहेब कामारकर यांना
तरुण तडफदार युवा सरपंच प्रसादभाऊ कृष्णराव ठाकरे सरपंच ग्रा.पं. करंजी ( सो ) यांनी निवेदन दिले.
