
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदाचे ग्रहण सविस्तर वृत्त असे. मागील दोन वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी तर नाहीच परंतु प्रभारी अधिकाऱ्याची सुद्धा नियुक्ती करण्यात आली नाही. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदे रिक्त आहेत.डी एच ओ कार्यालय झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येते आहे. रिधोरासह परिसरातील नागरिकांना आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून लाखो रुपये खर्च करून शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्या केंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली आहे. मात्र सुविधा देणारे डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे ही इमारत कुचकामी ठरली आहे. वैदकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना खाजगी डॉक्टरांन कडून उपचार करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे गरीब रुग्णाच्या खिशाला भ्रूदंड सहन करावा लागत आहे.सदर
वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या रिधोरासह ३६ गावाचा कारभार रामभरोसे आहे.पाच ते सहा महिन्या पासून प्रभारी डॉक्टरांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली नाही. तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथील वैद्यकीय अधिकारी तीन पदे रिक्त तर ओ.नि.अ. एक पद रिक्त तर आरोग्य सेविका चार पद रिक्त तर आरोग्य सेवक चार पद रिक्त तर आरोग्य सहाय्य एक पद रिक्त असल्याने सदर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे असल्यामुळे रिधोरासह ३६ गावातील नागरिकांना पैसे खर्च करून खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करून घ्यावं लागत आहे तर वडकी ते राळेगाव हे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर असल्यामुळे या रोडवर काही अपघात घडल्यास प्रथम वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अपघातग्रस्तांना पोहोचवल्या जातात परंतु इथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अपघातग्रस्तांना वीस किलोमीटर पर्यंत जावं लागत आहे.त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेत उपचार न मिळाल्याने अपघात ग्रास्ताना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा एक ना अनेक घटना या रोडने घडलेल्या आहे. याबाबत अनेक वेळा वाढोणा बाजार सह परिसरातील लोकप्रतिनिधीने या प्राथमिक आरोग्य केंद्र बाबत नाराजी व्यक्त केली आहे.तर या प्राथमिक आरोग्य केंद्र बाबत अनेक वेळा तक्रारी सुद्धा दाखल झाल्या आहे. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ना खासदार लक्ष देत ना आमदार लक्ष देत याचे कारण काय? हा एक संशोधनाचाच विषय आहे. अशी चर्चा रिधोरा परिसरात होताना दिसत आहे.तर २६ नोव्हेंबर रोजी ११ च्या दरम्यान वाढोणा बाजार येथे आटमुर्डी फाट्यावर उभ्या बसला दुचाकीने जबर धडक दिल्याने एक महिला ठार तर दोन गंभीर जखमी झाले होते. या तीनही जखमींना वाढोणा बाजार येथील प्रकाश पोपट, सतिश जाधव, विनोद मांडवकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथे तातडीने उपचारासाठी आणले असता तिथे एकही डॉक्टर हजर नव्हते तर तिथे ॲम्बुलन्सची व्यवस्था होती परंतु त्या ॲम्बुलन्स मध्ये डिझेल सुद्धा उपलब्ध नव्हते शेवटी प्रकाश पोपट यांनी सहखर्चाने ॲम्बुलन्स मध्ये डिझेल टाकून अपघातग्रस्तांना राळेगाव येथे हलविण्यात आले होते शेवटी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. वेळेत उपचार झाला असता तर कदाचित ती महिला वाचू शकली असती असे वाढोणा बाजार सह रिधोरा येतील नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. तर अशा एक ना अनेक घटना या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षित धोरणामुळे घडत असल्याचे बोलल्या जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथील वैद्यकीय अधिकारी व रिक्त पदे त्वरित भरावी. सदर वैद्यकीय अधिकारी व रिक्त पदे न भरल्यास आम्ही आमरण उपोषणाला बसू असा इशारा येथील माजी उपसरपंच प्रकाश पोपट, सतिश जाधव, विनोद मांडवकर यांनी दिली.
