
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ज्या घरात ही दुःखद घटना घडते त्या घरी त्या दिवशी चूल देखील पेटत नाही, शेजारचे असतील नातलग परिवार असेल त्या दिवशी मृतकांच्या आप्तेष्टांना जेवणाची पूर्तता करतात.हीच परंपरा व सहृदयता पुढे घेऊन जाण्याचा एक स्तुत्य उपक्रम राळेगाव येथे सुरु झाला आहे. साई वृद्धाश्रम मित्र परिवार राळेगाव चे वतीने राळेगाव व आसपास च्या गावातील मृत्यू झालेल्या परिवाराच्या घरी त्या दिवशी ५० लोकांचे जेवण निशुल्क पोहचविण्यात येणार आहे. या करीता कुणीही सपंर्क करावा असे आवाहन साई वृद्धाश्रम मित्र परिवार च्या वतीने करण्यात आले.
संवेदनशीलता ही भारतीय मनाचा उपजत गुणधर्म मानल्या जातो. दुःखाच्या प्रसंगी एकमेकांना आधार देण्याची परंपरा ही आपली ओळख आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन संवेदना जपण्याचे कामं इथला माणूस पिढ्यानंपिढ्या करत आला आहे. राळेगाव तालुक्यात याच हेतूने विविध क्षेत्रातील सुजाण नागरिक एकत्र आले. सीता मातेच्या पावन भूमीत साई वृद्धाश्रम आकारास येतो आहे. याच भावनेतून मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या घरी त्या दिवशी ५० लोकांचे जेवण घरपोच उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरु झाला.
यात घरपोच जेवण पुरविण्यात येणार आहे . या करीता गावातील कुणीही सपंर्क केल्यास वेळेत मृतकाच्या घरी जेवणाची पूर्तता करण्यात येणार आहे. १ ऑक्टॉबर पासून या दुःखद प्रसंगी सहवेदना, संवेदना चा प्रत्यय देणाऱ्या उपक्रमाला राळेगाव येथून सुरुवात झाली.
मृत्यू ही अंत्यत दुःखद घटना असली तरी आपल्याला ती स्वीकारावी लागते. कोरोना काळापासून मी मृत्यूची भयावहता जवळून अनुभवली. सेकडो लोकांना कोरोनात जिवं गमवावा लागला. आता ही अपघात, आजार यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घरचा कर्ता व्यक्ती गेल्यावर तॊ दिवस त्या कुटुंबाकरिताच नव्हे तर एकूणच परिचिता करीता देखील खूप क्लेशदायक असतो. मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या घरी त्या दिवशी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी नातलग येत असतात. त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी कुणीतरी पुढाकार घेतच असतो.मात्र बरेचदा काही मर्यादा येतात. शेजारी, नातलग देखील दुःखात असतात. त्या मुळे मृत्यू झालेल्या घरी 50 लोकांचे जेवण पोहचविण्याचा उपक्रम सुरु केला आहे.या बाबत सपंर्क करावा. घरपोच निशुल्क जेवण पुरविण्यात येईल.
शशिकांत उर्फ बाळू धुमाळ
नगर सेवक न. प. राळेगाव
