जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे कृषि व इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर अतिथी व्याख्यान

. हिंगणघाट दि. 30/11/2022 स्थानीय जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता 9 वी ते 12 वी तील व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करण्याकरिता कृषि व इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने प्राचार्य गंगाधर ढगे यांच्या मार्गदर्शनात अमित कावळे व राजेन्द्र बल्लेवार यांना अतिथी व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य गंगाधर ढगे व व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे यांनी प्रमुख व्याख्याता अमित कावळे व राजेन्द्र बल्लेवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेचे प्राचार्य ढगे यांनी विद्यार्थ्यांना सम्बोधित करतांना म्हटले की मल्टि स्कील या विषयामुळे विविध कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करायला सुवर्ण संधी प्राप्त होत आहे ही फार आनंदाची बाब आहे .मुख्य व्याख्याता कृषी अमित कावळे यांनी विद्यार्थ्यांना शेती म्हणजे काय , शेतीची मशागत , पिकांवरील आजार , उपाय , कलमांचे प्रकार , भविष्यातील कृषी विभागातील संधी याविषयी मार्गदर्शन केले तर राजेन्द्र बल्लेवार यानी इलेक्ट्रॉनिक्स विभगात उपयोगात येनारे विविध कम्पोनंट्स व त्याचा उपयोग तसेच कंट्रोल पैनल म्हणजे काय? वायरिग कशी करायची याबद्दल सविस्तर प्रत्याक्षीकाच्या मध्यमातून समजावून सांगितले. कार्यक्रमा चे समारोप व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे यांनी आभार करून केला . यासाठी प्राचार्य श्री गंगाधर ढगे,पर्यवेक्षक सुनील फुटाणे , कुरेशी, डॉ अनिस बेग, जाधव , बरडे , भुते, तराळे,पवार,दिवटे , कर्नाके , चाफलेकर , काटेखाये , काटकर, महेशगवळी , दांडेकर , राऊत, झाकेरीय व्यवसाय शिक्षक हर्षल बोधनकर, सुमित तलमले, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.