
तालुका प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप व विदर्भ | अध्यक्ष आशिष आवळे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्यातील शहर व जिल्ह्यात उद्योजक निर्माण अभियान राबविण्यात येणार आहे . या अभियानात तरुणांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन विदर्भ अध्यक्ष आशिष आवळे यांनी केले आहे . या अभियानात उद्योग , व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना व अनुदानांची माहिती देण्यार येणार आहे . शिवाय उद्योग व व्यवसाय उभा करण्यासबंधीचे तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन , उद्योग , व्यवसासाच्या प्रत्यक्ष भेटी , प्रकल्प अहवाल , भांडवल उभारणीचे पर्याय , यंत्र सामुग्री आणि पायाभूत सुविधा उभारणी , याबाबत मार्गदर्शन व सहकार्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून केले जाणार आहे . या उपक्रमाद्वारे वर्षभरात किमान 500 उद्योजक तयार करण्याचा मान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला आहे . करीता या अभियानात तरुणांनी सहभागी व्हावे , असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष आशिष आवळे यांनी केले आहे .