
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट
संपूर्ण देशात व तसेच महाराष्ट्र मध्ये कोरोना थैमान माजवत होता म्हणूनच त्या थैमानाला आवरण्या करिता लसीकरण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे म्हणूनच देशा पाठोपाठ महाराष्ट्र मध्ये पण लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे व याला नागरिकांचा पण उत्कृष्ट प्रतिसाद आहे.
सरकार ने १८ वर्ष वरील तरुणांना कोविड लस चालू केल्या पासून अनेक तरुण लस घेण्याकरिता पुढाकार घेऊन सरकार ला सहकार्य करत आहे . परुंतू लस घेण्याकरिता आलेल्या नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात हून रांगा लागत आहे व नागरिकांची या रांगेत गैरसोय सुद्धा होत आहे. दिनांक ३ जुलै ला इंदिरा गांधी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट येथे खूप मोठ्या संख्येने लोक कोविड व्याक्सिन घेण्याकरिता आले असताना फारच मोठी रांग लागली. नागरिकांची गैरसोय नाही झालीं पाहिजे म्हणून स्थानिक समाजसेवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष युवराज माऊस्कर व मित्रपरिवाराने स्वखर्चातून तासन तास रांगेत उभे असलेल्या नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याची व्यवस्था करून दिली व अशाप्रकारे नागरिकांची गैरसोय न व्हावी यासाठी प्रशासनाद्वारे तोस पावलं उचलायची गरज आहे, हे निदर्शनात आणून दिले.
