
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भरारी महिला बचत गटांच्या सहकार्यातून कोकाटे मंगल कार्यालय वडकी येथे स्त्रीरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजना करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन डॉ. पर्वणी लाड व भरारी महिला प्रभाग संघ अध्यक्ष सौ. विद्याताई मोहनभाऊ लाड त्यांच्या प्रभागातील सर्व सदस्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा,डॉ अशोकराव उईके हे होते,तर प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती सभापती प्रशांतभाऊ तायडे,जी,प सदश्य चित्तरंजनदादा कोल्हे,भाजप शहर अद्यक्ष डॉ कुणालभाऊ भोयर,सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ काकडे,माजी सभापती प्रवीणभाऊ कोकाटे एमडी मिलिंद भाऊ फुटाणे, सौ प्राजक्ताताई कोकाटे, सौ उज्वलाताई फुटाणे,,वाढोना ग्रा,पं सरपंच सौ जयश्रीताई मांडवकर,वडकी चे उपसरपंच शैलेशजी बेलेकर,गजाननजी लढी,विनोदभाऊ मांडवकर,विशालजी पंढरपुरे,शारदानंदजी जयस्वाल, किशोरजी गारघाटे, अनिलजी नंदूरकर,मोहनभाऊ लाड,रणजितजी ठाकरे,विठ्ठलजी वडस्कर, अरुणजी घुगरे, पुंडलिकरालव झोटिंग,हे होते
या शिबिरात महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरिता 13 डॉक्टरांचा चमू आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे येथून वडकी येथे बोलाविण्यात आले होते. एकूण तीस गावांमधून साधारण तीनशे महिलांनी या शिबिरात उपचारांचा लाभ घेतला. गर्भ पिशवी चे आजार, पांढरे पाणी जाणे, वंध्यत्व, खूप पाळी जाणे, अजिबात पाळी न जाणे अशा बऱ्याच आजारावर उपचार करण्यात आला. पुढील उपचाराकरिता ६० रुग्णांना सावंगी मेघे रुग्णालय येथे बोलविण्यात आले आहे. विनोबा भावे रुग्णालय येथील डॉक्टर सुरेखा तायडे डॉक्टर आशिष व इतर सहकारी उपस्थित होते.
सर्व महिला या उमेद मुळे एकत्र आलेल्या आहेत व उमेद ची संकल्पना ही दशसूत्री वर आधारित आहे. त्यातील सहावे सूत्र म्हणजे ‘आरोग्याची काळजी घेणे’ हे आज खऱ्या अर्थाने सफल झाले. या कार्यक्रमाला लागणारा खर्च हा संपूर्णतः महिला सहकार्यातून साकारण्यात आला, ही बाब अत्यंत स्तुत्य आहे.
महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी असणे व ते साकार करण्यासाठी असणारी जाणीव या कार्यक्रमातून दिसून आली. सर्व महिलांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच महिला सबलीकरणाचे ध्येय उमेद च्या माध्यमातून पूर्ण होत आहे असे दिसून आले.
