
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ : दि 9 ऑगस्ट
स्वतंत्र चळवळीत देशाच्या इतिहासात स्वतंत्र सेनानी चे महत्व अनन्य साधारण असून त्यांच्या कुटुंबाचे योगदान महत्व पूर्ण असल्याचे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना विजय वडेट्टीवार यांनी केले ते पुढे म्हणाले की काँग्रेस व देशाची स्वतंत्र चळवळ याचे महत्वपूर्ण नाते आहे, याच काँग्रेस ला यवतमाळ जिल्ह्यात आपण एक नंबर चा पक्ष बनविणार असून आगामी काळात ज्यास्तीत ज्यास्त उमेदवार काँग्रेस निवडून आणणार आहे यासाठी आपण स्वतः जिल्हाभर लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी या वेळी केली ते जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित श्री समर्थ प्राईड मध्ये जिल्हा काँग्रेस च्या विस्थारीत कार्यकारीणी बैठक व स्वतंत्र सेनानी व त्यांच्या परिवाराच्या सदस्यांचे सत्कार समारंभ क्रांती दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी स्वतंत्र सेनानी परिवरातून सौ.भारतीताई प्रवीण जानी, श्री. अनिल दादा राऊत,श्रीमती मालतीताई आंनदराव देशपांडे,श्री राजेंद्रभाऊ बाबारा राऊत,श्री मोहनभाऊ अंबादास महाजन,श्री रवीन्द्रजी ओंकारराव दिवे,श्री रमेशराव कवडुजी पिसालकर ,श्री कैलासराव मरोतराव सुलभेवार,श्री प्रतिकभाऊ नंदकुमार रामटेके यांचा सत्कार करण्यात आला,
या वेळी ना विजयभाऊ वडेट्टीवार, माणिकरावभाऊ ठाकरे, आ डॉ वजाहत मिर्झा, वसंतरावजी पुरके, विजयराव खडसे, बाळासाहेब मांगुळकर, प्रवीणभाऊ देशमुख, राहुलजी ठाकरे, डॉ महंमद नदीम, अशोकराव बोबडे, अरुणभाऊ राऊत, प्रफुल्लभाऊ मानकर, मनीषभाऊ पाटील, वनमालाताई राठोड, जावेद अन्सारी, टिकारामजी कोगरे, स्वातीताई येडे, पुष्पाताई नागपुरे, जयाताई पोटे, जीवनभाऊ पाटील, राम देवसरकर, नितीन जाधव, आनंद शर्मा, अतुल राऊत, विक्की राऊत, साहेबराव खडसे, अनिल गायकवाड, कृष्णा पुसनाके, जितेश नावडे, घनश्याम अत्रे, जाफर खान, जाफर उपस्थित होते, संचालन तातू देशमुख यांनी तर आभार अरविंदभाऊ वाढोणकर यांनी मानले.
