युवा मित्र परिवार काचनगांव कडुन रक्तदान शिबिराचे आयोजन..

१५ ऑगस्टच्या निमीत्ताने ७५ व्या स्वातंत्र्यदिनी काचनगांव येथे युवा मित्र परिवारा कडुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन काचनगांव ग्रामपंचायत चे सरपंच ताणबाजी तळवेकर याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणुन लाभलेले कॉंग्रेस कमेटीचे हिंगनघाट तालुकाध्यक्ष बालूभाऊ महाजन; राजुभाऊ मंगेकर बाजार समिती संचालक; प्रीतिलता कांबळे पं समिती सदस्या; श्रीरामभाऊ साखरकर निराधार समिती सदस्य; अजयभाऊ रिठे पोलिस कर्मचारी वडनेर; अंकुशराव कापसे माजी सरपंच व विधमान ग्रा पं सदस्य; अशोकराव साखरकर पोलिस पाटील; प्रदिपजी ताटेवार सर मुख्याध्यापक; राजू आंबटकर माजी सरपंच पवनी व इतर मान्यवर उपस्थित होते..
मानव जन्म मिळाला त्याचे ॠण समाजहितासाठी काही परतफेड म्हणून रक्तदान शिबिराला 38 युवकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम सफल करण्यासाठी प्रणय साखरकर, विजय ढगे, सतिश कापसे, मंगेश खोडे विठ्ठल चिंचूलकर व सर्व गावतील युवा मंडळींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम सफल बनवीला
~~~~