राळेगांव करांचे प्रेम सदैव स्मरणात राहील सी.ओ.अरुण मोकळं…

राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

प्रशासन चालविताना नागरिक,कर्मचारी,लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन शहरातील समस्या आणि विकासात्मक धोरण राळेगांव शहरात राबविण्याचा प्रयत्न करत,नौकरी ची सुरुवात केली.शहरातील लोकांनी दिलेलं प्रेम,आलेले चांगले वाईट अनुभव ही शिदोरी मला आयुष्यभर उर्जा देत राहील,राळेगांव करांचे प्रेम सदैव स्मरणात राहील असे भावनिक उदगार मुख्याधिकारी अरुण मोकळं यांनी निरोप समारंभात व्यक्त केले. 
अरुण मोकळं सी.ओ. यांचे स्थानांतरण देऊळगावराजा येथे झाल्याने,कर्मचारी वृंद व नागरिकांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. 
या वेळी माजी नगराध्यक्ष बबनजी भोंगारे,माजी उपनगराध्यक्ष ॲड प्रफुल्लसिंह चौहान,संपादक फिरोझभाऊ लाखाणी यांनी आपल्या मनोगतातून साहेबांनी केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी गोवर्धनराव वाघमारे,राजाभाऊ दुधपोळे,सतीशजी डाखोरे,सुधाकरराव गेडाम,अफसरअली सैय्यद,पत्रकार बांधव व नगर पंचायत राळेगांव चे कर्मचारी सह अन्य मान्यवर उपस्थित होते….