अतिवृष्टी ने घर पडले_तालुक्यातील  भांब येथील घटना …


राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

 राळेगाव शहर व तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात सतत धार पाऊस सुरू असल्याने भांब येथील सचिन आगरकर यांचे मातीचे घर जमीनदोस्त झाले आज दुपारी दिडच्या सुमारास ही घटना घडली घर कोसळले तेव्हा सचिन आगरकर यांचे सात महिन्याचे बाळ घरात झोपले होते सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र घरातील अनाज व इतर वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गेल्या अनेक दिवसापासून परिसरात सतत धार पाऊस असून मातीच्या घराला कमालीचा ओलावा आला आहे त्यातूनच ही घटना घडली प्रशासनाने पाहणी करून मदत करावी अशी मागणी सचिन आगरकर यांनी केली आहे.