
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब :-जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील कळंब तालुक्यातील स्व. संगडाजी नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रम शाळेतील सात विद्यार्थ्यां गगन भरारी घेऊ शकतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कु. श्रावणी मेश्राम, समीर जाधव, कु. विद्या मस्के, कु. कल्याणी राठोड, कु. ईश्वरी जाधव, कु. कशिस चव्हाण, तन्मय आडे या सात विद्यार्थ्यांची इस्त्री भेटीसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विज्ञान पेरणा अभियान अंतर्गत या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे 15 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ही सहल होणार आहे विशेष म्हणजे अतिशय दुर्गम व गरीब कुटुंबातील या होतकरू विद्यार्थ्यांना पुणे विमानतळावरून विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे या मोहिमेत पुणे पिंपरी चिंचवड बेंगळूर त्रिवेद्रम तिरुअनंतपुरम आणि कन्याकुमारी अशा प्रमुख शहरांचा समावेश असून यादरम्यान विविध वैज्ञानिक संस्थांना भेटी दिल्या
विमानाने इस्त्रोची वारी ही
जातील यामध्ये इस्त्रो केंद्र त्रिवेंद्रम अंतराळ विज्ञानाचे थेट दर्शन वैज्ञानिक म्युझियम विज्ञानातील प्रगतीचा इतिहास विवेकानंद रॉक मेमोरियल व गांधी मेमोरियल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक आधी स्थळांचा समावेश आहे या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दुलीचंदजी राठोड शाळेचे मुख्याध्यापक अविनाश चव्हाण, प्राचार्य दिनेश आडे, प्रा. प्रकाश राठोड, सहाय्यक शिक्षक कैलास जाधव, प्रा. प्रवीण किन्हेकर, प्रा. अरुणा गेडाम, प्रा. प्रेमदास
चव्हाण, प्रा. अक्षय राठोड, अधीक्षिका कंचना राठोड, दिलीप राठोड, ओंकार निमकर, आश्रम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
