
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण उपक्रम गट संसाधन केंद्र पंचायत समिती राळेगाव अंतर्गत जिल्हा कार्यालय गोधणी रोड यवतमाळ येथे आज दि-१२/०९/२०२१ रोजी कॅलिपर फिटमेंट व Alimco शिबिर घेण्यात आले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचा वाटप करण्यात आले. या शिबिरस्थळी विद्यार्थी उपस्थित ठेवण्यासाठी व साहित्य मिळवून देण्यासाठी पंचायत समिती चे विशेष शिक्षक श्री. राहुलजी पोटूरकर, दिपेश शेंडे, विनोद मेंढे व समनव्यक माधुरी धामंदे यांनी परिपूर्ण प्रयत्न केले. तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना प्रत्यक्ष प्रवास भत्ता व अल्पोपहार भत्ता अदा करण्यात आले. उपस्थित सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले तसेच दिव्यांग विद्यार्थ्या साठी यापुढेही अश्याप्रकारचे शिबिर घेण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली.
