
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या कार्याला वीस वर्ष पूर्ण होत आहे .हे समर्पण देशा प्रतिअसल्याने त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2021 दरम्यान सेवा व समर्पण अभियान संपूर्ण देशभर पक्षाच्या वतीने राबविण्याचे ठरले आहे.देशाचे पंतप्रधान यांचा ७१वा वाढदिवस सतरा सप्टेंबरला करण्याचे ठरले आहे. या निमित्याने वसंत जिनिग कोल्हे सभागृहात समाजातील विविध स्तरातील वेगवेगळ्या योजनेतील ७१ लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे .पंतप्रधान संपूर्ण जगात लोकप्रिय आहे .आपल्या आयुष्यातील गुजरात चे मुख्यमंत्री दोन दा व भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे .देशातील सर्वच घटकांचा विचार करून विकाच्या मुख्यप्रवाहात आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहे .दिनांक सतरा सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यन्त सेवा समर्पण अभियान राळेगांव मतदार संघात राबविण्याच्या दृष्टीने मतदार संघाचे आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईके यांनी सर्वच बूथ प्रमुख ते पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद साधून हे अभियान प्रत्येक गाव पातळीवर लोकांमध्ये जाऊन राबवावे असे आव्हान सर्वांना केले आहे तसेच या दरम्यान आरोग्य तपासणी शिबिरे ,स्वछता अभियान, गावाजवळील नदी स्वछता व इतर कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येणार असल्याचे आमदार प्रा डॉअशोक उईके यांनी अभियानाची माहिती देतांना सांगितले यावेळेस आमदार प्रा डॉ अशोकरावजी उईके ,भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ भुतडा,जिल्हा सरचिटणीस ऍड प्रफुल्लभाऊ चव्हाण,भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिप सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
