चिखली ग्रामपंचायत कडून गावात डेंग्यू प्रतिबंध धुरळणी संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली ( वनोजा ) येथे गेल्या काही दिवसांपासून तापाचे प्रमाणात खुप वाढ झाली होती त्यात डेंग्यू मलेरिया टायफाईड सारखे आजार गावातील लोकांना होत होते, अशातच गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत चिखली ला डेंग्यू प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी असे निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायत चिखली दिनांक 15/09/2021 रोज बुधवार ला सायंकाळी पाच वाजता दरम्यान धुरळणी केली व गावातील नागरिकांना दिलासा दिला
यावेळी धुरळणी करताना चिखली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक विजया मुन सह ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेन्द्रजी भटकर, लोकेशजी दिवे, रोजगार सेवक मयुरजी जुमळे कर्मचारी कवडूजी पतिंग सह गावातील नागरिक हजर होते व चिखली गावात आनंद व्यक्त होत आहे.