
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नगर पंचायत राळेगांव च्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती सर्वसाधारण साठी जाहीर झाले आहे.
नगर पंचायत राळेगांव मध्ये काँग्रेस पक्षाचे अकरा नगरसेवक नगरसेविका निवडून आले आहे. आणि सर्व प्रकारचे आरक्षण निहाय सदस्य काँग्रेस पक्षा जवळ आहे.
अनुसूचित जमाती चे दोन सदस्य काँग्रेस पक्षाचे आहे.प्रभाग क्रमांक दहा चे नगरसेवक रविंद्र शेराम व प्रभाग क्रमांक बारा ची नगरसेविका सौ.कविता कुडमेथे या असून पक्षश्रेष्ठी कोणाला पसंती देतात?
सर आणि भाऊ च्या मतानुसार भावी नगराध्यक्ष कोण?
हे ही लवकरच समजेल.
अपक्ष तीन,शिवसेना दोन व राष्ट्रवादी कॉंग्रेस एक असे उर्वरित पक्षीय बलाबल या वेळी नगर पंचायत राळेगांव मध्ये आहे हे विशेष.
