अवैधरित्या कापूस खरेदी करणारे वाहन जप्त

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सहकार विभागाने केलेल्या कारवाईत पळसकुंड येथे अवैधरित्या खरेदी करण्यात आलेला कापूस जप्त करण्यात आला. अमित नंदुरकर (रा. मुंझाळा, ता. केळापूर) याने खरेदी केलेला कापूस आणि त्याचे वाहन जप्त करण्यात आले.सहायक निबंधक कैलास खतारे सहकार विभागाचे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार, निरीक्षक विनोद झांबरे, प्रतवारीकार सुभाष कोवे, लिपिक साईनाथ ताठे या पथकाने (एमएच ३४ ३१२५) या वाहनातील दोन ते अडीच क्विंटल कापूस जप्त केला. अमित नंदुरकर याच्यावर कारवाई करण्यात आली, असे कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.