गुलाबी बोंडअळीबाबत कृषी विद्यालयाच्या विद्यार्थी नींनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव- मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ यांच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२१ अंतर्गत कृषि महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. साक्षी ज्ञानेश्वरराव थुटे हिने रावेरी येथील शेतकरी मोहनराव हिवरे यांच्या शेतात गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करत प्रात्याशिक केले.
कामगंध सापळे बोंडअळी येण्याची सूचना देतात शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीच्या नायनाट साठी शिफारशीप्रमाणे एकात्मिक किड व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. यासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले. मागील वर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने राज्यातील ४० टक्क्यावर कपाशीचे उत्पादन घटले होते. हे कामगंध सापळे (फेरोमेन ट्रंप बोडअळी अगोदरच्या अवस्थेतील पंतगाची सुचना देण्याचे काम करतात. कामगंध सापळ्यात तीन दिवसात आठ ते दहा बोंडअळीचे पंतग आढळल्यास त्या भागात बोंडअळी आल्याची महत्वाची सुचना आहे. असे करा बोंडअळी व्यवस्थापन ५% निंबोळी अर्क किंवा असाडी रॅण्टीन ०. १५ टक्के २५ मिली १० लीटर पाण्यात घेऊन त्वरीत फवारणी करावी तर प्रादुर्भाव लक्षणीय नुकसान असल्यास (५–१० टक्के फुलांचे, पात्या नुकसान) क्विनाफ्लोस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा प्रोफेनोफोस ५० टक्के प्रवाही २० मिली १० लिटर पाण्यात घेऊन त्वरीत फवारणी करावी. तसेच डोमकळया वेचून नष्ट करणे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ही माहिती देण्यात आली. या उपक्रमाला गावातील शेतकरी उपस्थित होते. यासाठी त्यांना महाविद्यालयाचे मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.