राळेगांव प्रकल्पात पोषण अभियान व पोषण माह अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे……

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

 एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प राळेगांवच्या वतीने प्रत्येक अंगणवाडी स्तरावर सप्टेंबर पोषणमाह व पोषण अभियान राबविले जात आहे. राळेगांव अंगणवाडी केन्द्रांअर्तगत  आहार प्रात्यक्षिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्व अंगणवाडी सेविकांनी पाककृती तयार केली. पर्यवेक्षिका मंजुश्री खसाळे यांनी उपस्थित महीलांना संतुलित आहार व स्वास्थ्यदायी आहाराविषयी मार्गदर्शन केले, स्थानिक सेविकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील महीलांना कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले तसेच योगा बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर आहार, आरोग्य, स्वच्छता, याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी संजिवनी ओंकार, विस्तार अधिकारी सागर विठाळकर, पर्यवेक्षिका, तडस, बेरड, समन्वयक केवटे यांनी भेट दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका शेंडे, दिघडे, तुरणकर,झोटिंग, उईके, तांबेश्वर, इरपते तसेच मदतनीस मंदा आमटे,चंदावार, झुझुरकर, कुचनकर,यांनी परिश्रम घेतले.