राष्ट्रीय सेवा योजना दिवस आनंदनिकेतन महाविद्यालयात ऑनलाइन संपन्न

    

24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आनंदनिकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा इथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर चे सिनेट सदस्य तसेच समृद्धी को-ऑपरेटिव बँक नागपूर चे संचालक असणारे मा. श्री वामन तुर्के हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आनंदनिकेतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणाऱ्या मा. तुर्के सरांनी यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून आपली काय भूमिका व कामगिरी असली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. शिवाय कसलाही स्वार्थ न ठेवता समाजामध्ये होत असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन कसे करावे, त्याची हानी कशी थांबवावी याबद्दल मार्गदर्शन केले. अगदी महाविद्यालयातील नैसर्गिक साधन संपत्तीही विद्यार्थ्यांनी कशी जपावी याबद्दलही विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रम अधिकारी डॉ.नरेंद्र पाटील यांनी याप्रसंगी आपला आत्तापर्यंतचा राष्ट्रीय सेवा योजनेचा अनुभव,व वर्धापन दिनाची संकल्पना समजावून सांगितली. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी या कार्यक्रमा- मागची भूमिका मांडली. कोरोनाकाळातही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जे उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल कौतुक केले,व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आभासी पध्दतीने चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. चे स्वयंसेवक श्री हितेश चंद्रभान घुगल. एम.ए (अर्थशास्त्र) भाग दोन व आभार प्रदर्शन श्री संकेत अरुण कायरकर. एम.ए (राज्यशास्त्र) भाग दोन यांनी केले. या कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.