स्व. डॉ. बाबारावजी भोयर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरात आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

स्व. डॉ. बाबारावजी भोयर यांचे स्मृती प्रित्यर्थ डॉक्टर कुणालभाऊ मित्र परिवार राळेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे जिल्हा वर्धा रुग्णालयांच्या खर्चात सवलत देणारे शिबिर आज दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी रविवारला महावीर स्कूल राळेगाव येथे आयोजित करण्यात आले होते

या शिबिराचे उद्घाटन राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.डॉ.अशोकरावजी उईके यांच्या हस्ते करण्यात आले, या शिबिरा करिता प्रमुख पाहुणे म्हणून चित्तरंजनदादा कोल्हे तालुका अध्यक्ष भाजपा तथा पंचायत समिती सभापती प्रशांत भाऊ तायडे, जी,प सदश्या उषाताई भोयर प्रीतीताई काकडे जिल्हा परिषद सदस्या, श्रीमती शीलाताई सलाम उपसभापती पंचायत समिती राळेगाव, सौ स्नेहाताई येनोरकर सदस्य पंचायत समिती राळेगाव,प्रदीपभाऊ कडु वडकी (मेघे सांवगी)हे उपस्थित होते.

या शिबिरामध्ये रक्तदाब ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, डोक्याचे सर्व आजार, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, मासिक पाळीचे आजार, लहान मुलांचे सर्व आजार, त्वचेचे विविध आजार, फॅक्चर, तसेच हाडाचे सर्व आजार, कान नाक घसा चे सर्व आजार, दमा, बरेच दिवसाचा खोकला, सह विविध आजाराची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली असून आवश्यक रुग्णावर सवलतीच्या दरात हायड्रोसिल शस्त्रक्रीया 1999/- रुपये तसेच दोन्ही बाजूची 2499/- रुपये आणि शस्त्रक्रिया एका बाजूची 4999/- रुपये दोन्ही बाजूची 6,499/- रूपयांपासूनचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया 999/- यामध्ये होणार आहे
या शिबिरात शहरातील तसेच तालुक्यातील हजारो रुग्णांनी लाभ घेतल्याचे दिसून आले.