आष्टा,बोरी,मेंगापुर शेतकरी हवालदिल तालुका अधिकारी यांनी तात्काळ सर्वे करून शासनाकडे अहवाल सादर केला पाहिजे – मधुसूदन कोवे

शेतकऱ्यांवर अशी नैसर्गिक अस्मानी संकट येत असले तर शेतकऱ्यांना मदत आणि सहकार्य करण्याची जबाबदारी तालुक्यातील प्रशासन अधिकारी यांनी घेतली पाहिजे असा हल्लाबोल मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेलं नुकसान पाहुण शेतकरी हवालदिल झाला आहे

आष्टा,बोरी,मेंगापुर येथे जाऊन शेतकरी संवाद कार्यक्रमात गावचे सरपंच सोनु बाई तोडासे मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच साधनाबाई गांजरे ग्राम पंचायत सदस्य आष्टा मा युसूफ भाई सय्यद लोक सेवक भारतीय कीसान महासंघ नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा आहे बोरी मेंगापुर येथिल ग्राम पंचायत मधिल विज कनेक्शन विज वितरण कम्पणीने कपात केल्या मुळे बोरी मेंगापुर गावं अंधारात आहे पावसाने सोयाबीन तूरीचे पिकं पिवळे पडले आहे घरटॅक्स भरण्यासाठी लोक अदालत ची नोटीस बजावण्यात आली आहे शेतकऱ्यांनी काय करावं हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे?

शेतकरी अस्मानी संकटामुळे चिंताग्रस्त होऊन आहे आलेलं पिकं पाण्याखाली गेले आहे विज बिलाचा तगादा लावत गावं अंधारात ठेवत आहे आणि कर वसुली साठी लोकं अदालतीच्या नोटीस बजावण्यात येत आहे मग तालुक्यातील प्रशासन अधिकारी शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांच्या परस्थिती चा आढावा का?घेत नाही असा सवाल मा.मधुसदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केला आहे