नदीत बुडून दापोरी कासार येथील संतोष काळे यांचा मृत्यू

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, राळेगाव

राळेगाव तालुक्यातील दापोरी कासार येथील युवक संतोष दिलीप काळे यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या की अपघाताने मृत्यू या बाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मुळ दापोरी येथील रहिवासी असणारा हा युवक गेल्या काही वर्षा पासून आजनसरा येथे राहात असल्याची माहिती आहे.
काल पासून ते बेपत्ता असल्याची माहिती आहे. गाय नेऊन देतो म्हणून ते घराबाबाहेर पडले होते. आज सकाळी नदी पात्र|त त्यांचा मृतदेह आढळून आला.पोलीस अधिक तपास राळेगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्ग दशनाखाली पो. हवा. शालीक लडके पो.कॉ. राहुल मोकळे करीत आहे. तालुका प्रतिनिधी राळेगाव. रामु भोयर