
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुक्यातील सोयाबीन,कापुस उत्पादक शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई देणेबाबत दि 28 सप्टेंबर रोजी शेतकरी संघटना युवा तालुका आघाडीची तहसीलदार राळेगाव यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या मरण्याची वाट बघू नका
मागच्या 2020 मध्ये सुद्धा विदर्भातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचे पैसे मिळाले नाही. यावर्षी 2021 मध्ये तशाच पद्धतीत सोयाबीचे नुकसान झाले आहे, मोठ्या प्रमाणात कापसातील बोंड खराब झाले आहे. तरीही पंचनामे झाले नाही. कोणत्या पक्षाचा नेता सुद्धा शेतकऱ्याविषयी बोलायला तयार नाही.
माझ्या विदर्भातील शेतकरी मायबापांनो आता तरी जागे व्हा. या राजकीय पक्षांच्या नेत्यांना गुलाम होऊ नका.
स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला तयार राहा
स्वतंत्र विदर्भाची मागणी करा.
कसा जगेल माझ्या विदर्भातील शेतकरी.
याला म्हणतात ओला दुष्काळ
पेरणीच्यावेळी महीनाभर पावसाने चाट मारली
आता हल्के धान,मुंग,ऊडीद, सोयाबीन,सारखे पीक काढणीसाठी तयार असता रोजच मुसळधार पाऊस पडतो आहे
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी असे निवेदन तहसिलदार साहेब राळेगांव यांना देण्यात आले यावेळेस अक्षयभाऊ महाजन शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख राळेगांव,गोपालभाऊ भोयर,गजाननराव ठाकरे,श्रीहरीजी राजुरकर,गजाननराव पारखी,दिशाताई नगराळे,भास्करराव पाठील,नारायणराव कुत्तरमारे,करूनाताई वानखडेे,सुरेशभाऊ आगलावे इत्यादी शेतकर्या सह उपस्थित होते.
