अपघात: दुचाकींच्या धडकेत एक जागीच ठार तर तीन गंभीर जखमी. 


गडचांदूर ते कोरपना दरम्यान असलेल्या  फाट्याजवळ झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण धडकेत 1 दुचाकीस्वार जागीच ठार झाला असुन अन्य 3 गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर ते कोरपना दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असुन कित्येक ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे झाले असुन जीव रपना तालुका हा औद्योगिक तालुका असल्यामुळे ह्या मार्गांवरून जड वाहनांची सतत वर्दळ असते. बरेचदा क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे साहित्य भरून ट्रक जात असल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
अशा मार्गावरून लहान वाहन चालवताना चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. बरेचदा लहान मोठे अपघातही होत असतात. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास वडगाव फाट्याजवळ 2 दुचाकी एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात 1 दुचाकीस्वार जागीच ठार झाला असुन इतर तिघेही गंभीर जखमी झाले आहे.
वृत्त लिहीत पर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन पोलीस कारवाई सुरू आहे.
 

रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे