
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
विदर्भ राज्य आंदोलन समिती बाभुळगाव येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले आहे कार्यक्रमाचे आयोजन मा.ॲड.वामनराव चटप माजी आमदार विदर्भवादी नेते आणि मा रंजना ताई मामर्डे महिला अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या उपस्थितीत होत आहे.
कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मा.समिर शिंदे युवा नेतृत्व बाभुळगाव यांच्या पुढाकाराने सर्व तरुण युवक, शेतकरी शेतमजूर, विदर्भ राज्य आंदोलन समिती चे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कार्यकर्ता बैठकीत १) स्वंतत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी चळवळ तिव्र करण्यासाठी मार्गदर्शन २) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात झालेलं नुकसान झाले यासाठी मार्गदर्शन होणार आहे ३) बाभुळगाव कार्यकारिणी बाबत चर्चा करण्यासाठी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले आहे
या बैठकीला जिल्ह्यातील सर्व विदर्भवादी नेतृत्व शेतकरी, युवा आघाडी, महिला, यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मा.कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा.मधुसुदन कोवे गुरुजी अशोकराव कपिले अरुण जोग ॲड.अजय चमेडीया शहर अध्यक्ष यवतमाळ अशोकराव कारमोरे राजेंद्र झोटींग मनोजभाई चमेडीया इंदरचंद बैद्य जयंतराव बापट आणि सर्व पदाधिकारी व विदर्भवादी नेतृत्वाने सहभागी व्हावे.
