घरकुल संबंधी तात्काळ तोडगा काढा – मनसे ची मागणी

  • Post author:
  • Post category:इतर

प्रतिनिधी / सालेकसा

सालेकसा नगरपंचायत तर्फे आज मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विशेष करून घरकुल संबंधित चर्चा होणार असल्याची बाब ग्रामस्थांना कळताच अर्जदारांनी नगरपंचायती मध्ये एकच गर्दी केली होती. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत मनसे सालेकसा च्या वतीने नगरपंचायत कर्मचारी पदाधिकारी व नागरिकांमध्ये समन्वय साधत घरकुल या विषयासंबंधी तोडगा काढण्याचे नगरपंचायती ला निवेदन दिले. स्थानिकांना हक्काचे घर मिळालाच पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे असे म्हणत मनसेच्या वतीने मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात विशेष करून घरकुला संबंधित तीन मागण्या ठेवण्यात आल्या. त्यामध्ये सर्वप्रथम उर्वरित देयके अदा करण्याबाबत ची मागणी करण्यात आली. याशिवाय भूमिहीन तसेच शासकीय जागेवर निवासी असलेल्या नागरिकांसाठी पट्टे वाटप करत घरकुल तत्काळ मंजूर करून देण्यात यावे, प्रलंबित यादीतील नागरिकांनाही घरकुल तात्काळ मंजूर करून देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. कित्येक नागरिक अर्धवट घर बांधकाम झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर थाटले असून त्यांना आर्थिक मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने नियोजन पूर्वक बांधकाम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना वेळोवेळी देयके अदा करून आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष ब्रजभूषण बैस यांनी केली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष ब्रजभूषण बैस, शहराध्यक्ष राहुल हटवार, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष भौतिक हरिणखेडे, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष स्वप्नील करवाडे, इतर महाराष्ट्र सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.