
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
चंद्रपूर: अगदी कमी वयात एखाद्याने मातृ-पितृछत्र हरवणे अतिशय क्लेशदायक असते,ही हाणी कधी भरून न निघणारी आणि याचे दूरगामी परिणाम छत्र हरविलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर होत असतात.बँक ऑफ इंडिया नेरी येथे रोजंदारीवर कार्यरत असलेले श्री गजानन मेंडुलकर (वय 55) यांचा दि.25.12.2020 रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला पश्चात केवळ 3 दिवसांनंतर दुर्दैवाने त्यांची पत्नी सौ.संगिता (वय45) यांचा देखील मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात मुलगा हेमंत (वय 21, विद्यार्थी) आणि मुलगी धनश्री (19 विद्यार्थी) असा परिवार आहे.आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आणि त्यातच एवढ्या कमी वयात या दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला,अचानक आलेल्या परिस्थितीमुळे त्या मुलांजवळ काहीही शिल्लक नव्हते आणि अशातच ही माहिती संस्थेचे सदस्य श्री.कार्तिकजी वराटे यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोषजी ताजने आणि नाते आपुलकीचे परिवारास दिली,घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेच्या सर्व सदस्यांनी या मुलास मदत करण्यासाठी संमती दर्शवली, आज दि.03 जानेवारी 2021 ला संस्थेचे सदस्य श्री.प्रविणभाऊ ढुमणे आणि श्री.सचिनभाऊ बोनसुले यांच्या हस्ते 20 हजारांचा धनादेश दिवंगत श्री.गजाननजी मेंडूलकर यांचा मुलगा हेमंत याला संस्थेचे सचिव प्रा.प्रमोदजी उरकुडे,उपाध्यक्ष श्री.किशनजी नागरकर,संघटक श्री.किशोरजी तुराणकर आणि सल्लागार श्री.उमेशजी पारखी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला,नाते आपुलकीच्या प्रत्येक सदस्यांच्या सहकार्याने ही रक्कम मदत म्हणून देण्यात आली,ही तुटपुंजी मदत हेमंतवर आलेल्या दुःखापुढे नगण्य असली तरी ती त्याच्या दुःखावर थोडीफार का होईना सुखाची फुंकर नक्कीच घातल्याशिवाय राहणार नाही,याप्रसंगी प्रा.उरकुडे सरांनी त्या मुलाला त्याच्या पुढील शैक्षणिक भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले तर हेमंतनी संस्थेचे आभार व्यक्त केले.
