
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
पो उप निरीक्षक दिलिप पोटभरे पोलीस स्टेशन राळेगाव कार्यरत असताना राळेगाव तालुक्यातील अवैद्य धंदे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण केली व बरेच गुन्हेगारांनी त्यांच्या भीतीने अवैध धंदे बंद केले. राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये सोनटक्के साहेबांपेक्षाही पोटभरे साहेबांनी आपले वजन निर्माण केले. व त्यांचं नाव ऐकताच गुन्हेगारांना थरकाप सुटायचा अशा प्रकारची त्यांनी राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व गावांमध्ये गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण केली.
मा पोलीस महासचालकाचे आदेशाने स पो नि पदावर् पदोन्न्ती मिळाली होती, परन्तु राळेगावातील काही झारीतिल शुक्राचार्य, समाजकंटक, खंडणीकरीता प्रशासकिय अधिकारयानां वेठीस धरनारे समाजकंटक लोकानां ते पचले नाही.
समाजकंटक लोकानी एकत्र येवून गोर गरीब मच्छीमार संस्थेतिल लोकांना हाताशी धरुले व त्यांचे पदोन्न्ती मध्ये अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परन्तु पोटभरे यानी हार न मानता थेट मैट कोर्ट नागपूर येथे धाव घेतली,
अखेर मैट कोर्ट नागपूर खंडपिठाने मा पोलीस महासंलकांचे पदोन्न्ती आदेशाप्रमाणे मोकळीक करण्यांबाबत मा पोलीस अधिक्षक सा यवतमाळ याना आदेशित केल्याने त्यान दि ३०/९/२०२१ रोजी सपोनि पदोन्न्ती वर नागपूर परिक्षेत्रात मोकळीक करण्यांत आले.
आज दि ०१/१०/२०२१ रोजी सपोनि दिलिप पोटभरे पदोन्न्ती वर नागपूर परिक्षेत्रात हजर झालेत.
