सर्वोत्तम जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग म्हणजे पंचशीलाचे आचरण: केंद्रीय शिक्षिका संगीताताई कुंभारे

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा
भारतीय बोद्ध महासभा तालुका शाखा
कळंब समता सैनिक दल, पंचशील भीम मंडळ, रमाई महिला मंडळ द्वारा आयोजित त्यागमूर्ती समर्पिता रमाई च्या १२५ व्या जयंतीदिनाच्या निमित्त तालुक्यातील बुद्धविहारात १२५ शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.दिनांक २९/१/२०२३ ते सुरवात दि.७/१/२०२३ पर्यंत तालुक्यातील सावरगाव, आस्टी, मलकापूर, हरणे ले आऊट कळंब, तथागत नगर कळंब येथे १० दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजनाने होत आहे.
पंचशीलेच्या आचरणानेच प्रत्येक व्यक्ती सर्वोत्तम जीवन जगू शकतो असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षिका संगीताताई कुंभारे यांनी धम्म प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करताना केले. कार्यकमाचे अध्यक्ष जयकुमार भवरे, उदघाटक जिल्हा अध्यक्ष भगवानजी इंगळे, तालुका अध्यक्ष नारायण बुरबुरे, केंद्रीय शिक्षिका संगीताताई कुंभारे मालाताई बरडे, उमाताई इंगोले, विशाखाताई नन्नावरे, मायाताई लढे उज्वलाताई भवरे यांनी सर्व शिबिरार्थी ना मार्गदर्शन केले.सुगत नारायने उज्वलाताई नारायने यांनी शिबिरासाठी हरणे ले आऊट मध्ये जागा उपलब्ध करून दिली.समता दूत रुपेश वानखडे, हलवले सर,ओमप्रकाश भवरे,उद्धवराव इंगोले,अनिल तामगाडगे,सुधाकर खेरकार,सुधाकर ठोंबरे धनराज जवादे,जानराव वानखडे,अमित पिसे, धम्मपाल थोरात,लक्ष्मण ढाले,कोहिनुर वाघमारे,अश्विनीताई वानखडे वनिताताई कांबळे यांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी
संजय वाघमारे,रोमान्त पाटील, शुभम पिसे, रवी वानखडे,राजेंद्र बलवीर, सचिन भगत, अमित धवणे यांनी
परिश्रम घेतले. संचालन स्वरा कांबळे यांनी मलकापूर येथे ,लताताई भगत यांनी सावरगाव, निशा थोरात यांनी तथागत नगर, शुभम पिसे यांनी आस्टी,नारायन बुरबुरे यांनी हरणे ले आऊट येथे संचालन केले.
सर्व शिबिराचा समारोप व राष्ट्रगौरव स्पर्धा परीक्षा पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान तथागत नगर कळंब येथे दि.७ फेब्रुवारी २०२३ रोजी रमाई जयंती दिनी करण्यात येईल.
दहा दिवस चालणाऱ्या शिबिराला जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार विभाग सचिव जयकुमार भवरे यांनी केले आहे.