
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
3 ऑक्टोंबर रोजी रात्री 9 वाजता महादेव दामोजी उमरे(59) त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. उपचारासाठी वडनेर येथे दवाखान्यात नेले असता दवाखान्यात प्राणज्योत मावळली.
त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच खैरी येथील कर्तव्यदक्ष तलाठी अविनाशजी पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराचे सांत्वन केले. व त्यांच्या मृत्यूने खैरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.
