
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुलभाऊ मानकर यांनी खैरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपकेंद्र यांच्या वतीने गदाजी बोरी येथील देवदर्शनासाठी जाणाऱ्या भावीक भक्ताना महाप्रसाद व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. कही वर्षोनवर्ष पारंपारीक चालत आलेली गोटमार बोरीची यात्रा हि जगभरात प्रसिद्ध आहे. या यात्रेचे महत्व म्हणजे असे कि गदाजी महाराज यांच्या नावाने हे गाव प्रसिद्ध आहे व धुली वंदणाच्या दिवशी गदाजी महाराज याच्या नावाने गोटमार केली जातात या गोटमारी मध्ये एखाद्या भाग्यवान व्यक्तीला तो गोटा लागतो त्यानंतर तो व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असतो त्यानंतर त्या व्यक्तीची ब्यांड बाजा लावुन अंतयात्रा काढुन त्या व्यक्तीला गावभर फिरवून गदाजी महाराज यांच्या मंदीरात आनुन त्याला महाराजाचा प्रसाद व अंगारा दिल्या बरोबर तो व्यक्ती परत होश मध्ये येतो असे या यात्रेचे वैशिष्ट आहे. हि यात्रा बघण्यासाठी तालुक्यातुनच नाही तर आजुबाजुच्या जिल्ह्यातुन लाखो भाविकभक्त येत असतात दोन वर्षे कोरोणा महामारीच्या काळामध्ये हि यात्रा बंद होती परंतु नव्याने काही शासनाने यात बदल करून कोरोणाचा प्रकोप कमी झाल्याने परत यात्रेसाठी परवानगी देण्यात आली. सर्व शासनाचे नियम पाळून हि यात्रा सपन्न झाली. या यात्रेला परिसरातुन येणाऱ्या भाविकासाठी महाप्रसाद व ठंड पाण्याची व्यवस्था राळेगाव कृषी उत्पन्ना बाजार समितीचे सभापती प्रफुलभाऊ मानकर यांच्या मार्गदशना खाली खैरी येथे धुलीवंदणाच्या पर्वावर दिंनाक १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यत राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविंद्रभाऊ निवल यांच्या पुढाकाराने खैरी उपबाजार समिती केंद्र प्रमुख सुभाषराव कोवे यांनी बोरी गदाजी येथे गोटमार यात्रेस जाणाऱ्या भाविकासाठी महाप्रसादाची व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेशी बाजार समितीचे कर्मचारी किशोरजी वानखडे, मयुरजी गावंडे, प्रशांतजी निवल, विनोदजी हेपट, पुंडलीकजी कोवे, व गावातील रमेशजी आसुटकर, विनोदजी माहुरे, मारोती दंडाजे, रमेश डफरे, दत्ताजी महाजन, सुधाकर बोडे, तृषांत महाजन, अंकुश गव्हानकर, विशाल पाटील, अशोक वनकर व इतर नागरीक उपस्थित होते.
