राजमाता जिजाऊ ,आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून गायत्री फाउंडेशन दिग्रस तर्फे जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

गायत्री फाउंडेशन दिग्रस तर्फे आज दिनांक बारा एक दोन हजार बावीस ला ,दुपारी एक वाजता !राजमाता जिजाऊ ,आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून गायत्री फाउंडेशन दिग्रस तर्फे जयंती साजरी करण्यात आली !प्रथम आई जिजाऊ ना सौ स्वाती जमदाडे यांनी प्रतिमेचे पूजन केले. व नंतर सौ बबीता राठोड सौ विद्या राठोड यांनी आई जिजाऊ च्या प्रतिमेला माल्यार्पण केले !स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला नामदेव पवार ,डॉक्टर उत्तम राठोड यांनी माल्यार्पण केले !याप्रसंगी आई जिजाऊ च्या प्रेरणेने ,आपल्या मुलांवर संस्कार देऊन ,मूलांचे भविष्य घडविणार्‍या आई यांचा सत्कार करण्यात आला ! १)श्री बकेश बळीराम पवार ,या मुलाने यु पी एस सी परीक्षा मध्ये भरघोस यश संपादन करून देशातून( 516 )व्या क्रमांकावर विजय प्राप्त केल्याबद्दलयांच्या आईचा सत्कार शाल श्रीफळ व मेडल देऊन,डॉक्टर उत्तम राठोड संस्थापक-अध्यक्ष गायत्री फाउंडेशन यांनी केला! व२) वेदांत मुधोळकर या मुलाने जूडो, कराटे या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर स्वर्ण पदक पटकाविले.तज् त्यां बद्दल त्यांच्या आई सौ विना मुधोळकर यांचा सत्कार ,बबीता राठोड यांनी शाल श्रीफळ व मेडल देऊन केले .३)प्रथमेश उत्तमराव सोळुंके या विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये भरघोस यश संपादन करत ,प्रवेश मिळवल्याबद्दल गायत्री फाऊंडेशनच्या सचिव विद्या उत्तम राठोड यांनी त्यांना शाल श्रीफळ व मेडल देऊन सत्कार केला !४) वैष्णवी मुधोळकर या मुलीने जुडो या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये स्वर्ण पदक पटकावल्या बद्दल ,सौ स्वाती सिद्धार्थ जमधडे यांनी सत्कार केला !याप्रसंगी विद्यार्थिनी, विद्यार्थी व बऱ्याच महिला उपस्थित होत्या! या सत्कार सोहळ्यात सौ स्वाती जमदाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले! या कार्यक्रमाचे संचालन, गायत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम राठोड (MD, LLB, PGDEMS)यांनी केले सचिव सौ,विद्या राठोड यांनी आई जिजाऊ प्रमाणे ,मुला ,मुलीवर संस्कार घडविणे व त्यांना यश संपादन करण्यासाठी मदत करणे ही काळाची गरज असल्याचे ,सांगून कार्यक्रमाची सांगता केली !याप्रसंगी सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल गायत्री फाउंडेशन तर्फे सर्वांचे आभार मानले !या कोररोना,आजारातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले !धन्यवाद .याप्रसंगी करू,रवीना चव्हाण, रोहिनी राठोड ,दिपाली पत्रे, अंजली तायडे ,रक्षा तायडे ,वैष्णवी मुधोळकर ,नामदेव पवार ,विष्णू बावणे ,भगवान बावणे, सिद्धार्थ जमदाडे ,विद्या जाधव ,वैशाली जाधव व बऱ्याच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.