विदर्भाच्या अस्मितेसाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या चळवळीत तरुणांनी सहभागी झाले पाहिजे- ॲड.वामनरावजी चटप साहेब

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कळंब येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उपस्थित मा.ॲड.वामनरावजी चटप साहेब (माजी आमदार) आणि मा.रंजनाताई मामर्डे महिलाअध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांच्या उपस्थितीत झाली.

सहविचार सभेचं प्रास्ताविक मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ यांनी केले.सहविचार सभेत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी या चळवळीत तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कधीच स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी सभागृहात आवाज उठविला नाही ही वस्तुस्थिती आहे
विदर्भातील लोकांवर सातत्याने होत असलेला असलेला अन्याय विदर्भातील जनता का?सहण करतात हा चिंतेचा विषय आहे राजकीय पक्षांच्या गुलामगिरी ला विदर्भातील जनता कंटाळली आहे म्हणून आता राजकीय पक्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण होणं आवश्यक आहे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती सतत आंदोलन करत आहे या आंदोलनाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहे आता तरुणांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या सहविचार सभेचं आयोजन अशोकराव उमरतकर भास्करराव महाजन यांनी केले होते या सभेला उपस्थित दिंगाबरराव घाडगे, मारोतराव जुमनाके, देविदासजी काळे, सौ विजया रोहणकर, अशोकराव कपिले, अरुणराल जोग सत्यप्रकाशजी उमरे, अमितजी पिसे, पोकळे काका, पन्नासे गुरुजी, बुरबुरे भाऊ, नितीनजी ठाकरे, बहुसंख्य विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.