
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना नई दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वरजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ओबीसी समाजावर केंद्र आणि राज्य सरकार कशाप्रकारे दुजाभाव करतो आहे. केंद्र सरकारची ओबीसी जनगणना करायची मानसिकता का नाही ? कशाप्रकारे ओबीसी ची मुलं शासकीय नोकरीपासून वंचित राहत आहे. यासह अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली, यावेळी राळेगाव तालुका ओबीसी जनमोर्चा ची कार्यकारणी डॉ. ज्ञानेश्वरजी गोरे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आली. त्यात तालुका अध्यक्षपदी राजुभाऊ रोहणकर तर उपाध्यक्षपदी जानरावभाऊ गिरी, बाळूभाऊ धुमाळ सचिवपदी विवेकभाऊ गवळी, सह सचिवपदी राजूभाऊ नागतुरे, जिल्हा उपाध्यक्ष पदी तातेश्वरजी पिसे सर तर सदस्य पदी राजूभाऊ भाजपाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे विलासराव काळे, ज्ञानेश्वरजी रायमल, प्रमोदजी राऊत, भानुदासजी केळझरकर, अशोकराव मोहुरले, तातेश्वरजी पिसे, किशोरजी थोटे, जानरावभाऊ गिरी, राजूभाऊ रोहनकर प्रदीपभाऊ ठूणे, विवेकभाऊ गवळी, बाळूभाऊ धुमाळ, अमोलजी काळे, संजयजी इंगोले, भूपेंद्रजी मांडवकर, राजुजी नागतुरे निखीलजी भाजपाले, राजूजी भाजपाले, निखिलजी राऊत, विनोदराव अलबनकर, प्रकाशजी खुडसंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव काळे यांनी केले तर आभार विवेकभाऊ गवळी यांनी मानले.
