
वडकी पो,स्टे अंतर्गत येत असलेल्या येवती येथे कपडे धुतलेले पाणी सरकारी नालीमध्ये सोडा रोडवर येऊ देऊ नका या कारणावरून वाद करून दगडाने डोक्यावर मारून एकास जखमी केल्याची घटना दि 22,10,2021 रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली,
मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार सचिन विजय नक्षीने वय 31 वर्ष रा येवती व आरोपी रोशन त्रंबक देवतळे वय 32 रा येवती ये दोघे येवती येथील घराशेजारी राहत असून यात रोशन देवतळे यांचे नेहमी कपडे धुण्याचे पाणी विजय नक्षीने यांचे दुकानासमोर येत असल्याने त्यामुळे विजय नक्षीने याने रोशन देवतळे ला तुमचे कपडे धुतलेले पाणी सरकारी नालीमध्ये सोडा रोडवर येऊ देऊ नका असे म्हटले असता आरोपी रोशन देवतळे व अन्य 2 जणांनी संगनमत करून सचिन नक्षीने सोबत वाद करून शिवीगाळ केली व दगडाने डोक्यावर मारून जखमी केले यात सचिन नक्षीने याचा मोठा भाऊ आई वडील यांना सुद्धा थांबदाबूक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी सचिन नक्षीने यांनी वडकी पो,स्टे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी सर्व आरोपीवर कलम 324,504,506,34 अंतर्गत सदरचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दि 24,10,2021 रोजी पोलिसांकडून देण्यात आली आहे,या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे asi अशोक भेंडाळे सह आकाश कुदुसे करीत आहे
