
बल्लारपुर तालुक्यातील येनबोड़ी ते मनोरा रोड चे नुतनीकरन लवकरात लवकर करा
मनसे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी
बल्लारपुर तालुका येनबोडी किन्ही ते मानोरा हा रोड पावसा अभावी खराब झालेला असुन रस्त्यावर ठिक , ठिकाणी मोठ ,मोठठे खडडे पडले आहे यामुळे या रस्तयावरून ये ,जा करणाऱ्या व्यकतींना , प्रवाशांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे या रस्त्यामुळे कधी काळी मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र याकडे
आजपर्यंत कुणाचेच लक्ष नसल्याने नागरीक अशा रस्तयाअभावी त्रस्त झाले असुन सबंधीत विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन येन बोड़ी किन्ही मानोरा या मुख्य मार्गाचे नुतनीकरन या सात दिवसाच्या आत करावे अन्यथा मनसेकडून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल आणी याला जबाबदार संबधीत प्रशासन असेल हे निवेंदन बल्लापुर मा, उपविभागीय अभियंता बल्लारपुर यांना मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांनी दिले होते. त्यावर उपविभागीय अभियंता बल्लारपूर यांनी तात्काळ दखल घेत रस्त्याच्या नुतनीकरणास सुरवात केली आहे त्या वेळी निवेंदन देत असतांना उपस्तीत मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे महीला सेना तालुका अध्यक्ष कल्पना पोतर्लावार शहर उपाध्यक्ष सचिन दायकर क्रिष्णा पोतर्लावार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
