रावेरी येथे ई पीक पाहणी बाबत मागदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे राज्यातील एकही शेतकरी ई पीक पाहणी पासून वंचित राहू नये या अनुषगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कू. तनया विलास मसराम हीने रावेरी येथील शेतकऱ्यांना ई पिक पाहणी बाबत मागदर्शन केले . यावेळी संवाद साधून ई पीक पाहणी अपलिकेशन वापरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण केले. तसेच पिकपेरा नोदणी चे फायदे व नुकसान याबाबत शेतकऱ्यांना सांगितले.