
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मुद्रा कर्जाबाबत भारतीय स्टेट बँक राळेगाव चे व्यवस्थापक श्री . पंकज पांगरकर यांना निवेदन . सध्या भारतिय स्टेट बँके मार्फत मुद्रा कर्ज योजना सुरु आहे . यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो परतु शेकडो युवक – युवती अर्ज करत आहे पण त्यांचा अर्ज स्विकारल्या जात नाही आहे . त्यामुळे अर्ज करणाऱ्याची निराशा होत आहे म्हणून राळेगाव तालुक्यातील – शहरातील सुशीक्षीत बेरोजगार तरुण – तरुणी हताश झाले आहे . म्हणून मुद्रा कर्ज योजनेचा अर्ज ऑफलाईन स्विकारावा किंवा आनलाईन चा घोळ दुरूस्त करावा ‘ काही अटी शिथील कराव्या व जनतेला मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्यावा व त्यांचे जीवन सुखमय करावे अशा मागण्याचे निवेदन देते वेळी शिवसेना शहरप्रमुख राकेश राउळकर ‘ संदिप पेन्दोर उपशहरप्रमुख . शंकर गायधणे . संतोष कोकुलवार . महेन्द्र तुमाने योगेश मलोन्डे युवासेना शहरप्रमुख . मनोज वाकुलकर ‘ इमरान पठाण ‘ दिपक येवले . योगेश ठाकरे भाविसे तालुकाप्रमुख .रोशन इरपते भाविसे शहरप्रमुख . जगदिश सरदार . मनोज राउत . अनिल घारवटकर . चांदखा कुरेशी . राजु कोदाणे . व लताताई भोयर महिला आघाडी शहरप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
