
तालुक्यातील पुरड (नेरड) येथे सतत सात वर्षे अविरत सेवा देणाऱ्या व शासनाच्या विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या व गावकऱ्यांचा अडचणी सोडवण्यात अग्रेसर असणाऱ्या कृषी साहाय्यक एस. एन. शेंडे यांचा पुरड येथील लोकनियुक्त सरपंच सौ. सीमाताई विशाल आवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच नवीन रूजू झालेले कृषी साहाय्यक श्री. प्रशांत कोठारे यांचे स्वागत उपसरपंच प्रमोद भाऊ भगत यांचा हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक माजी पोलिस पाटील झिंगुजी पा. पिंपळशेंडे यांनी केले. यावेळी कर्मचारी श्री. पावडे श्री महल्ले हजर असून गावकरी माजी सरपंच अशोक मिलमिले, विलास खारकर, अनिल बोढे, निकेश भगत, प्रतिक थेरे, मनोज आवारी, व बरेच गावकरी हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल भाऊ आवारी, माजी तंटामुक्त अध्यक्ष नंदकिशोर खारकर यांनी सहकार्य केले.
