राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग) शाखा भालर यांच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज प्रवेशद्वाराचे अनावरण सोहळा संपन्न.

प्रतिनिधी:नितेश ताजणे,वणी

वणी: समतेचे पुरस्कर्ते ज्यांनी आपल्या दोह्या तून समतेचा संदेश दिला असे संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या नावाने राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभाग शाखा भालर यांच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज प्रवेशद्वाराचा अनावरण सोहळा अगदी सध्या पद्धतीने पार पडला.
ऐसा चाहू राज मैं, जहाँ मिले सबन को अन्न|
छोट-बडे सब सम बसे,रविदास रहे प्रसन्न|

मन चंगा तो कटोंती मे गंगा|संत रविदास महाराज असे अखंड भारताला समतेची व मानवतेची शिकवण देणारे संत रविदास महाराज यांच्या विचारांवर चालणारी संघटना राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा काही दिवसांपूर्वी भालर येथे गठीत झाली होती, या शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्याच परिश्रमाने भालर गावात भव्य प्रवेशव्दाराचे अनावरण सोहळा करून लोकार्पण करण्यात आले.
या अनावरण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जयराम पाटील बदखल तर अध्यक्षस्थानी नीलकंठराव चामाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ मंदा हेपट सरपंच भालर,देवेंद्र पारखी उपसरपंच भालर, तसेच पोलीस पाटील सौ अर्चनाताई हेपट,राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे युवा जिल्हा उपाध्यक्ष अमोल बांगडे,संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच वणी चे संघटक किसन कोरडे,वसंता देठे,श्याम गीरडकर, भालर शाखा अध्यक्ष सुरेश टिकले,शाखा उपाध्यक्ष हनुमान वादेकर,शाखा सचिव पंकज वादेकर व गावातील समस्त समाज बांधव व इतर गावकरी उपस्थित होते. “चर्मकार बांधवांच्या हक्कासाठी,हितासाठी गाव तेथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा स्थापन करू.” – अमोल बांगडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वादेकर यांनी केले,सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय टिकले,अरुण वादेकर,मनोज टिकले,सोनबाजी टिकले, चिंधूजी टिकले,रामचंद्र वादेकर,मारोती वादेकर, विलास वादेकर, चिरकुट काकड़े,मारोती टिकले, प्रविंन वादेकर,दशरथ टिकले,राजू टिकले,भावनाथ टिकले, प्रभाकर टिकले,अनिकित टिकले,अविनाश टिकले आदींनी परिश्रम घेतले.