
.
कृषी उत्पन्न बाजार समिती वणी यांचे मार्फत दिनांक 5 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत परवानाधारक व्यापारी धीरज सुराणा व त्याचा जामीनदार रूपेश कोचर यांनी 67 शेतक-याकडुन सोयाबीन,तूर ई. धान्य खरेदी केले परंतु आजपावेतो खरेदी केलेल्या धान्याचे पुर्ण चुकारे देण्यात आले नाहीत.
शेतक-याच्या या आर्थीक फसवणुकी विरोधात शेतक-यांनी मा. पंतप्रधान,मा. मुख्यमंत्री,मा. जिल्हाधीकारी ,मा.उपविभागीय अधिकारी ,मा. तहसिलदार,मा. ठाणेदार यांना निवेदन देउन सर्व शेतक-यांचे चुकारे तातडीने देण्यात यावे असे निवेदन आठ दिवसापुर्वी दिले होते पण 17 मे 2022 पावेतो एकाही शेतकी-यांचे चुकारे देण्यात आले नाहीत .
या आर्थीक फसवणुकी विरोधात दिनांक 17 मे ला सर्व शेतकी-यांची एक सभा घेउन यात दिनांक 18 मे 2022 पासुन बेमुदत साखळी उपोषण व चार ते पाच दिवसात चुकारे न मीळाल्यास त्यानंतर आमरण उपोषण करण्याचा निश्चय केला असुन या आंदोलनास सर्व अडते व अधिकाधिक शेतक-यांनी यांनी पाठींबा दिला आहे. या आंदोलनास आर्थीक पीडीत 67 शेतक-या सोबतच अडते व वणी तालुक्यातील असंख्य शेतकरी सहभागी होणार आहेत.
