ग्रामजयंती पर्वानिमित्य वंचित निराधार लोकाभिमुख अभियान,श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीचे आयोजन

वणी :- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती अर्थात ग्रामजयंती पर्वा निमित्य वंचित बहुजन आघाडी, श्रीगुरुदेव सेना व निर्मिती बहुद्देशीय संस्था व्दारा आयोजित वंचित निराधार लोककल्याण अभियान हा उपक्रम निराधार मार्गदर्शन शिबिर व्यसनमुक्ती अभियान आयोजित करून ता. १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत तालुक्यातील विविध गावात जाऊन राबविण्यात येणार आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या उपदेशात असे म्हटले की माझी जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात यावी व यात गावातील ज्या समाश्या असतील त्या सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमय व्हाया याच उद्देशाने श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी संपूर्ण एप्रिल महिना हा ग्रामजयंती पर्व म्हणून वंचित निराधार लोककल्याण अभियान सुरू केले आहे. या अभियानातून निराधार मार्गदर्शन व व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची सुरवात ता. ३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मेढोली येथील हनुमान मंदिरातून करण्यात येत आहे. तर ३० एप्रिल रोजी मूर्धोनी येथील ध्यान मंदिरात ग्रामजयंती पर्वाची सांगता करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ता. ३ रोजी मेंढीली, ता. ७ रोजी हनुमान नगर येणक, ता. १५ रोजी कोणा , ता. १७ रोजी तरोडा, ता. २३ रोजी मंदर, ता. २४ रोजी आकापूर ता. मारेगाव तर ता. ३० रोजी मूर्धोनी येथे निराधार , वयोवृद्ध , विधवा माता बघिनी, दिव्यांग व दुर्जर आजार ग्रस्तन मार्गदर्शन शिबीराच्या माध्यमातून त्यांची सेवा केल्या जाणार असून यात जे लोक व्यसनाच्या आहारी केले असतील त्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन त्यांना निर्वेसनी राहण्याचे आवाहन देखील करण्यात येणार आहे. या शिबिराचे मार्गदर्शक म्हणून दिलीप भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, सुभाष परचाके, प्रतिमा मडावी, विना ढवळे, आदि मान्यवर उपस्थित असणार आहे तरी सर्व गोर गरीब व गरजू लोकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी केले आहे.