
आशा सेवीकांचा सत्कार व नवनीर्वाचीत नगरसेवीकांचा सत्कार
कोरोनायोद्धा डाँक्टर्स व आशा सेवीकांचा सत्कार
मारेगाव नगरीत महिला सक्षमीकरण करण्याच्या हेतूने ग्रामीण परिसरात महिलांना रोजगार उपलब्ध करता येईल व सामान्य कुटूंबातील महिलांनी स्व:ताच्या पायावर उभे रहावे या हेतुने एकविरा महिला ग्रामीन पतसंस्था चे गठण करून देरकर कुटूंबानी मोलाचं योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्याच अनुषंगाने जानेवारी महिना तसा मातृसत्ताक समजला जातो… या महिन्यात आपल्या समाजाला उभ करण्याचं सामर्थ महिले मध्येच असते त्या महानयिका राष्ट्रमाता राजामाता जिजाऊ माँसाहेब तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सयुक्त जयंतीचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते, कार्यक्रमाला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरणताई देरकर डॉ.अर्चना देठे
तालुका वैद्यकिय अधिकारी मारेगांव डॉ.संगीताताई थोरात-आरोग्य सहाय्यिका कायर माजी, नगर अध्यक्षा -इंदूताई किन्हेकार , डॉ. सपना केलोडे महिला व बालरोग तज्ञ , वृषालीताई खानझोडे माजी उपसभापती वणी ,कु कविता सोयाम सरपंच विरकुंड….सर्व नवनिर्वाचित नगरसेविका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमांचे सुञसंचालन जिजाताई विरारकर यांनी तर आभार प्रदर्शन विद्याताई मत्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी संचालीका सुलभा लव्हाळे, माधुरी नगराळे, जिजाताई वरारकर, सुरेखा भेले, मंगला आसेकर , विद्या मत्ते, रंजना येरगुडे, अपर्णा घागी व बँक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
